धमाल... दोन सुपरस्टार्स अमिताभ- शाहरुख पुन्हा सोबत

बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पर्‍यादवर सोबत दिसणार आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट बदला यात शाहरुख आणि अमिताभ यांची जोडी दिसून येणार आहे आणि या सिनेमात तापसी पन्नू देखील प्रमुख भूमिकेत दिसून येईल.
 
आधी शाहरुख यात एका कॅमियोमध्ये दिसणार असल्याची बातमी होती परंतू ताज्या रिपोर्ट्सप्रमाणे शाहरुखच्या या चित्रपटात गेस्ट अपीयरेंस नव्हे तर प्रमुख भूमिका आहे. यात शाहरुख तापसी पन्नूच्या पतीच्या भूमिकेत असेल.
 
हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री असून यात अमिताभ पोलिस अधिकार्‍या भूमिकेत असून मर्डर केस सॉल्व करताना दिसतील आणि तापसी पन्नू एका उद्योगी महिलेच्या भूमिकेत असेल. हा चित्रपट स्पॅनिश सिनेमा कंट्राटैम्पो याचे ऑफिशियल हिंदी व्हर्जन आहे.
 
सूत्रांप्रमाणे जिरो रिलीज झाल्यावर शाहरुख 'बदला' ची शूटिंग सुरू करतील. तसेच अमिताभ- शाहरुख यापूर्वीही कभी खुशी कभी गम, भूतनाथ आणि मोहब्बते सिनेमात सोबत काम केलेले आहे आणि प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख प्रियंका-निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावली हजेरी, दंपतीला दिला आशीर्वाद