Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Amitabh Bachchan Birthday: चंदेरी दुनियेचा महानायक

Amitabh Bachchan Birthday: चंदेरी दुनियेचा महानायक
, बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (09:24 IST)
चंदेरी दुनियेचा महानायक, निःसंशय आपणच,
अमिताभ बच्चन नावाचं ते तेजोवलय आपणच,
मला तर तुम्ही माझ्याच घरचे सदस्य वाटता,
कारण चोवीस तास तुम्हीही आमच्या सोबत असता,
क्षण न क्षण  तुमचा आवाज ऐकण्याची सवय आम्हास,
घरात होतो सतत तुमचाच भास,
तुम्ही आम्हांस ओळ्खतही नाही ठाऊक आहे,
पण तुम्ही आमच्या परिवाराचा एक हिस्सा आहे,
डोळ्यातून कसं बोलायचं तुम्ही शिकवलं,
आवाजाच्या चढ उताराचं दर्शन घडवलं,
विनम्र भाव कसा असावा, ते सतत आम्हांस दिसतं,
एक विनोदी झालर कशी असावी, हे ही समजतं,
यशाच्या शिखरावर असतांना, खुप कर्ज झाले,
पण खंबीर राहून तुम्ही, त्यावर ही मात करून राहिले,
सतत कार्यरत राहणं काय असतं, बघावं तुम्हाला,
लाखोंच्या आशिर्वादाने पुनर्जन्म तुम्हांला मिळाला,
ही अद्भुत जादू पृथ्वीवरची, अशीच अबाधित राहावी,
अमिताभ बच्चन नावाची व्यक्ती जगात एकच उरून राहावी .!! 
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Amitabh Bachchan Birthday: Big B झाले 81 वर्षांचे, 'शहेनशाह'चे 8 ATB