rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमूल गर्लने अशी वाहिली सरोज खान यांना श्रद्धांजली

Amul pays tribute to Saroj Khan
, शनिवार, 4 जुलै 2020 (22:20 IST)
डान्स कोरिओग्राफर सरोज खान यांना खास शैलीत अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये कॅरीकेचरच्या माध्यमातून सरोज खान सलवार सूट परिधान करुन डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. तेजाब चित्रपटातील एक दो तीन या गाण्याचा संदर्भ घेत ही श्रद्धांजली अमूलने वाहिली आहे. हा फोटो शेअर करताना अमूलने लिहिले की – ‘Mother of Dance/Choreography in India’ ला श्रद्धांजली.
 
दरम्यान, माधुरीच्या एक दोन तीन या नृत्यामुळे सरोज खान अधिक लोकप्रिय झाल्यात. अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांची आवडती शिष्या होती.  तर सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. त्यांनी १९८३ मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे श्रेय सरोज खान यांना जाते. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी चित्रपटांमधील हिट गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठीही ते खास ओळखले जातात.चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सरोज खान यांच्याकडे २ हजारांहून अधिक गाण्यांच्या नृत्यदिशाचे श्रेय आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा दाखल