Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंधेरी कोर्टाने शिल्पा शेट्टी, बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले, 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

अंधेरी कोर्टाने शिल्पा शेट्टी, बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले, 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश
, रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (10:19 IST)
मुंबईतील अंधेरी न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर समन्स बजावले आहे. व्यावसायिकाने त्यांच्यावर  21 लाखांचे कर्ज घेऊन न 
फेडल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाने तिघींना ही 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडेच मुंबईतील एका न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सुमारे 15 वर्षे जुन्या अश्लीलतेच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेच्या कृत्याची शिकार शिल्पा झाल्याचे दिसते, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात गेरेने शिल्पाच्या गालाचे चुंबन घेतले होते, त्यानंतर दोघांवर अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांच्या कोर्टाने 18 जानेवारी रोजी शिल्पाची निर्दोष मुक्तता केली होती. या संदर्भातील सविस्तर आदेश सोमवारी उपलब्ध झाला. शिल्पा आणि रिचर्ड यांनी 2007 मध्ये राजस्थानमध्ये एड्सच्या विरोधात जनजागृती कार्यक्रमात भाग घेतला होता. यादरम्यान रिचर्डने स्टेजवर शिल्पाच्या गालाचे चुंबन घेतले होते, त्यामुळे देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला होता.

शिल्पा आणि रिचर्ड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2017 मध्ये हा खटला राजस्थानच्या कोर्टातून मुंबईत वर्ग करण्यात आला होता. रिचर्डने तिच्या गालावर चुंबन घेतल्यावर शिल्पावर विरोध न केल्याचा आरोप होता. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धर्मशाळा - हिमाचलची थंडगार राजधानी