Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ankita-Vicky Wedding: अंकिता लोखंडे नवर देवला मांडवात पाहून रडली

Ankita-Vicky Wedding: अंकिता लोखंडे नवर देवला मांडवात पाहून रडली
, मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (19:29 IST)
अंकिता लोखंडे आणि विकी जैन अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या जयमाळा चे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात दोघे खूप क्यूट दिसत आहेत. नवर देव बनलेला विकी जैन अंकिता लोखंडे समोर पोहोचला तेव्हा तिला आपल्या भावनांवर आवार घालता आले नाही आणि तिने विक्कीला मिठी मारली. वृत्तानुसार, विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये मराठी रितीरिवाजांनुसार लग्न होणार आहे. अंकिताने लाल रंगाऐवजी सोनेरी रंगाचा पोशाख परिधान केला आहे. तर  विकी जैन ऑफ व्हाइट शेरवानी मध्ये दिसत आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विकीने विंटेज कारमधून मिरवणुक काढली होती. आज लग्नाच्या दिवशी, विक्की जैनने विंटेज कारमधून भव्य मिरवणूक काढली. गोल्डन ड्रेसमध्ये अंकिता जैन क्वीनपेक्षा कमी दिसत नव्हती. विकी मांडवात पोहोचताच अंकिता भावूक झाली. ती अश्रू पुसताना आणि विकीला मिठी मारताना दिसली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनीमूनहून परतले विकी-कतरिना Video ; गळ्यात मंगळसूत्र, हातात चूडा, मुंबईला आलं नवविवाहित जोडपं