Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आणखी एक दक्षिणीकन्या

Another Southern girl
, बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (15:30 IST)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड यांचे अर्थकारण आणि प्रेक्षकवर्ग कितीही वेगळा असला तरी त्यांच्यामध्ये अनेक साम्स्थळेही आहेत. दुसरीकडे, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हिंदी सिनेमांमध्ये झळकताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्रींचे प्रमाण जास्त आहे. अगदी श्रीदेवीपासून ते
नगमा, मधू, तमन्ना, समीरा रेड्डी, असीन अशा अनेक दक्षिणीकन्या हिंदी सिनेमांमधून झळकल्या आणि त्यातील काहींना प्रेक्षकांनी पसंतीची पावतीही दिली.
 
आता दक्षिण भारतातील आणखी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये जलवा दाखवण्यासाठी तयार झाली आहे. तिचे नाव आहे अमला पॉल. अमला हिंदी चित्रपटसृष्टीत थेट रुपेरी पडद्यावर झळकणार नसून महेश भट्ट यांच्या वेबसिरीजच्या माध्यमातून ती आपल्या करिअरची सुरुवात करत आहे. 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीच्या जीवनावर आधारित या वेबसिरीजमध्ये ताहीर राज भासीन एका चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमला सांगते की, माझ्या भाषेबाबत आणि भाषाज्ञानाबाबत बी-टाऊनमध्ये अनेक प्रश्र्न उपस्थित केले गेले. त्यामुळेच मी वेबसिरीजची निवड केली. आता भाषाज्ञान उत्तम झाल्यानंतरच मी हिंदी चित्रपटांचा विचार करेन, असे अमला सांगते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बोनस’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...