अभिनय आणि चित्रपट निर्मिती या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारी अनुष्का शर्मा लवकरच एका नव्या आणि चौकटीबाहेरील भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. स्पॉटबॉय ई ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नारायण सिंग यांच्या चित्रपटात सरोगेट मदरची भूमिका साकारण्यासाठी अनुष्काला विचारणा करण्यात आली आहे. सध्या या चित्रपटासाठी जुळवाजुळव सुरु असून त्यासाठी कलाकारांची निवड केली जात आहे. त्यामुळे अनुष्का या चित्रपटातील सरोगेट मदरची भूमिका स्वीकारणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी अनुष्काच्याच नावाला पहिली पसंती देण्यात आली होती. राजस्थान आणि गुजरातमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. जॅस्मिन: स्टोरी ऑफ अ लीस्ड वोम्ब हा महिलाप्रधान चित्रपट असून, एका मुलीचा आई होण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.