rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरविंद स्वामीचे कमबॅक

arvind swami come back
, शनिवार, 30 जून 2018 (15:34 IST)
90च्या दशकात 'बॉम्बे'द्वारे प्रसिद्ध झालेले तमिळ अभिनेते अरविंद स्वामी यांनी दिग्दर्शक सेल्वा यांच्या आगामी तरपरपसरींवळ या तमिळ चित्रपटातून कमबॅक करत आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. यात चार अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. नव्वदच्या दशकात काही सिनेमा केल्यानंतर अरविंद यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आणि फॅमिली बिझनेसकडे लक्ष केंद्रित केले. पण जेव्हा ते सिनेमासृष्टीत कमबॅक करण्याच्या तयारीत होते, त्याचकाळात त्यांचा अपघात झाला होता. मणक्याला दुखापत झाल्याने त्यांना अर्धांगवायू झाला. यातून पूर्णपणे बरे व्हायला त्यांनाबराच काळ लागला. एका मुलाखतीत अरविंद यांनी सांगितले होते की, दहावी पास झाल्यानंतर त्यांची डॉक्टर व्हायची इच्छा होती. पण मी फॅमिली बिझनेस सांभाळावा, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे डॉक्टर होता आले नाही. कॉलेजच्या काळात पॉकेट मनीसाठी मी मॉडेलिंग करायचो. कॉलेजमध्ये जाहिरातीत मी काम केले होते. ती जाहिरात बघून मणिरत्नम यांनी मला मीटिंगसाठी बोलावले. त्यानंतर त्यांनी आणि संतोष सिवान यांनी मला अभिनयातील बारकावे शिकवले. मला पहिला ब्रेक मणिरत्नम यांनीच दिला होता. अरविंद यांनी मणिरत्नम यांच्या 'थलपति' या अ‍ॅक्शन ड्रामा तमिळ सिनेमेद्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर मणिरत्नम  यांचा आणखी एक सिनेमा त्यांनी साइन केला. याचे नाव होते 'रोजा'. यात मधू त्यांच्यासोबत झळकली होती. 'रोजा'साठी त्यांना तमिळनाडू स्टेटचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेडगावचा धर्मवीर गड