rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यन खानला घरून मिळतेय इतकी मनीऑर्डर; अशी आहे त्याची कारागृहात स्थिती

Aryan Khan gets so many money orders from home; Such is his condition in prison
, शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (23:38 IST)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर काल गुरुवारी सुनावणी झाली, पण आता निकाल दि.२० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. आता आर्यनला आणखी आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागेल. दरम्यान, आर्यनला कैदी क्रमांक 956 चा बॅच देण्यात आला असून त्याच्या खर्चासाठी घरून कुटुंबाकडून थोडीशी मनीऑर्डर आली आहे.
 
ड्रग्ज प्रकरणातील अटक झालेला आर्यन खान आता दि. २० ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये राहणार आहे. तसेच आर्यन खानचा बॅच नंबर N956 आहे. कारण तुरुंगात कोणालाही त्याच्या नावाने नाही तर त्याच्या नंबरने बोलावले जाते, आर्यनला त्याचा हा कैदी क्रमांकही मिळाला आहे.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, आर्यन खान तुरुंगात खूप अस्वस्थ दिसत आहे. आर्यन तुरुंगाचे अन्न नीट खात नाही, म्हणजेच त्याला ते जेवण आवडत नाही.परंतु येथे बाहेरचे अन्न आणण्याची आणि खाण्याची परवानगी नाही. मात्र आर्यनने जेलचे कपडे घातलेले नसून घरून आणलेलेच कपडे घातले आहेत. दरम्यान,आर्थर जेल अधिकाऱ्यांना दि.११ ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या कुटुंबाकडून त्याच्या खर्चासाठी ४५०० रुपयांची मनीऑर्डर मिळाली होती. कारण येथे एका व्यक्तीला एका महिन्यात फक्त ४५०० रुपयांची मनीऑर्डर दिली जाऊ शकते. आर्यन या पैशातूनच कॅन्टीनसाठी शुल्क भरत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या मंदिरावर जर वीज चमकली तर रामाचं दर्शन घडतं