Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानामध्ये बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग

पाकिस्तानामध्ये बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग
, गुरूवार, 18 मे 2017 (22:51 IST)

बाहुबली 2 या चित्रपटाने जगभरात 1475 कोटींचा आकडा पार केला असताना पाकिस्तानातही बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग मिळालं आहे. पहिल्या वीकेंडलाच पाकमध्ये साडेचार कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

बाहुबली 2 हा पाकिस्तानात रिलीज झालेला पहिला डब केलेला प्रादेशिक चित्रपट आहे. पाकिस्तानात बाहुबली 2 हा 100 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर झळकला आहे. चित्रपटाच्या कथानकात हिंदू पुराण आणि परंपरांवर भर असला, तरी पाकमधील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाकिस्तानचे सिने वितरक अमजद रशिद यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने एकही कट न सुचवता, यू प्रमाणपत्रासह बाहुबली 2 हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाला आहे. पाकिस्तानात पहिल्या आठवड्याभरात सहा कोटींची कमाई करण्याचा अंदाज आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tourism : सांस्कृतिक भारत : दमण व दीव