Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाहुबली 2 चे नवे पोस्टर रिलीज

बाहुबली 2 चे नवे पोस्टर रिलीज
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर  बाहुबली 2 या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. अभिनेता प्रभास म्हणजेच बाहुबली हत्तीच्या सोंडेवर आरुढ झालेला या पोस्टरमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे याआधीही एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. यावेळी रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

आतापर्यंत लाखो चाहत्यांनी हे पोस्टर शेअर केले आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटाचा बाहुबली : दी कन्क्‍लुजन हा सिक्वेल चित्रपट आहे. यावर्षी 28 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘परशा’, हॅपी बर्थडे