हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी पेडणेकर यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही बड्या कलाकाराची साथ नसताना दोघींनीही अतिशय सुंदर चित्रपट करून स्वतःला अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केले आहे. 'दम लगाके हईशा'सारख्या चित्रपटात लठ्ठ वधूची भूमिका करून जगावेगळ्या पद्धतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्या भूमीचे तर विशेषच कौतुक आहे. पहिल्या चित्रपटातील नॉनग्लॅमरस रूप पालटून ती आता चांगलीच स्लिम आणि अधिक सुंदर दिसू लागली आहे. आपले अनेक फोटो ती इन्स्टाग्रामवरही शेअर करीत असते. आताही तिने स्वतःचे काही नवे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. भूमी सध्या करण जोहरच्या मल्टिस्टारर 'तख्त'मध्ये भूमिका करीत आहे. यापूर्वी ती 'लस्ट स्टोरीज'मध्ये दिसून आली होती. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत जेचित्रपट केले ते सर्व हिट झाले आहेत. 'दम लगाके हईशा', 'टॉयलेट : एक प्रेमकथा', 'शुभमंगल सावधान'ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता ती अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोनचिरैया' या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसून येईल. यामध्ये तिच्यासमवेत सुशांतसिंह राजपूत आहे.
भूमीला अक्षयकुार वगळता बड्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळालेली नसली तरी बड्या बॅनरची साथ मात्र मिळालेली आहे. यशराज बॅनरच्याच चित्रपटातून तिने पदार्पण केले होते आणि आता धर्मा प्रॉडक्शनच्या 'तख्त'मध्ये ती काम करीत आहे.
धीमेपणाने, पण तिची कारकीर्द आता चांगली आकाराला येत आहे.