पुणेकर असलेल्या अवघ्या 23 वर्षीय एमसी स्टॅनचा रॅपर बनण्याचा प्रवास सोपा नव्हता.
तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस सिजन 16 चा विजेता ठरला आहे. तर शिव ठाकरे हा रनरअप ठरलाय. या निमित्ताने आपण आतापर्यंत विजेता ठरलेल्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
रॅपर एमसी स्टॅन हा छोट्या पडद्यावरील बिग बॉसया रियालिटी शोच्या 16 व्या सिजनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन शिव ठाकरे याला पछाडत 16 व्या सिजनचा विनर ठरला. तर शिव ठाकरे याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे हे दोघे अंतिम फेरीत पोहचले होते. दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत होती. मात्र अखेर मात्र एमसी स्टॅन याने बाजी मारली. बिग बॉस फिनालेच्या निमित्ताने याआधीच्या 15 मोसमांमध्ये विजेता ठरलेल्यांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
बिग बॉसची ट्रॉफी
सलमान खान याने एमसी स्टॅन याला बिग बॉसची ट्रॉफी दिली. हिरे आणि सोन्यापासून ही ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे. या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे.या ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुंदर काम करण्यात आले आहे. ही अत्यंत खास ट्रॉफी आहे.
आतापर्यंतचे बिग बॉस
1. बिग बॉस सिजन 1 विनर | राहुल रॉय, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी
2. बिग बॉस सिजन 2 विनर | आशुतोष कौशिक, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी
3. बिग बॉस सिजन 3 विनर | विंदू दारा सिंह, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी रुपये
4. बिग बॉस सिजन 4 विनर | श्वेता तिवारी, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी रुपये
5. बिग बॉस सिजन 5 विनर | जूही परमार, बक्षिसाची रक्कम : 1 कोटी रुपये
6. बिग बॉस सिजन 6 विनर | उर्वशी ढोलकिया, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
7. बिग बॉस सिजन 7 विनर | गौहर खान, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
8. बिग बॉस सिजन 8 विनर | गौतम गुलाटी, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
9. बिग बॉस सिजन 9 विनर | प्रिंस नरूला,बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
10. बिग बॉस सिजन 10 विनर | मनवीर गुर्जर, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये
11. बिग बॉस सिजन 11 विनर | शिल्पा शिंदे, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये, (शिल्पा : 44 लाख आणि विकास गुप्ता 6 लाख)
12. बिग बॉस सिजन 12 विनर | दीपिका कक्कड, बक्षिसाची रक्कम : 50 लाख रुपये, (दीपिका : 30 लाख आणि दीपक ठाकूर 20 लाख)
13. बिग बॉस सिजन 13 विनर | सिद्धार्थ शुक्ला, बक्षिसाची रक्कम : 50 लाख (सिद्धार्थ 40 लाख, पारस छाबडा 10 लाख)
14. बिग बॉस सिजन 14 विनर | रुबीना दिलैक, बक्षिसाची रक्कम : 50 लाख , ( रुबीना 36 लाख आणि राखी सावंत 14 लाख रुपये)
15. बिग बॉस सिजन 15 विनर | तेजस्वी प्रकाश, बक्षिसाची रक्कम : 40 लाख
अल्ताफ तडवी
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ तडवी आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. वयाच्या 12 व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केलं आहे. एमसीने अनेक गाणी गायली असली तरी यूट्यूबवर जवळपास 21 मिलियन व्ह्यूज मिळालेल्या वाटा या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. एमसी स्टॅनला भारताचा टुपॅक म्हटलं जातं.
एमसी स्टॅनचा जन्म30 ऑगस्ट 1999 रोजी जन्म पुणे येथील एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. पण लोकं त्यांला तुपाक या नावानेही ओळखतात. एमसी स्टॅनने बाराव्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. तो वयाच्या बाराव्या वर्षापासून कव्वाली गाायचा. त्याने भारतातील आणि जगभरातील अनेक मोठ्या गायकांसोबत स्टेजवर परफॉर्म केले आहे. सहावीला असताना त्याने रॅप लिहायला सुरुवात केली. आठवीला असताना त्याने पहिले रॅप गाणे गायले होते. त्याने त्याचा व्हिडीओ शूट केला होता पण काही
कुटुंबीयांनी रॅप गाण्याला कधीच पाठिंबा दिला नाही
त्याच्या कुटुंबीयांनी रॅप गाण्याला कधीच पाठिंबा दिला नाही. ते नेहमी त्याला टोमणे मारायचे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, तरीही ते वेळ फुकट घालवतोय असे शेजारी नातेवाईक त्याला म्हणायचे. पण एमसी स्टेनने कधीही हार मानली नाही आणि तो कठोर परिश्रम करत राहिला.काही काळानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला साथ देण्यास सुरुवात केली. आणि आज तो एका मोठ्या स्टेजवर असून त्याच्या पालकांनाही त्याचा अभिमान वाटतो.
कमी वयात तो कोट्यवधी रुपयांची कमाई
एमसी स्टॅन हिप-हॉप इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. हिप-हॉपमध्ये येण्यापूर्वी तो बीट बॉक्सिंग आणि बी-बॉयिंग करत असे. एमसी स्टेन केवळ २३ वर्षांचा असून इतक्या कमी वयात तो कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. तो बिग बॉस 16 च्या प्रीमियरला 60-70 लाख रुपयांचे हिंदी लिहिलेले नेकपीस आणि 80 हजारांचे शूज घालून आला होता. त्याने गेल्या तीन-चार वर्षांत इतकी लोकप्रियता मिळवली आहे. एमसी स्टेनची एकूण संपत्ती सुमारे 50 लाख आहे. त्याची गाणी आणि यूट्यूब आणि कॉन्सर्टमधून तो दरमहा लाखो रुपये कमावतो.
बिग बॉसची सुंदर ट्रॉफी, 31लाख 28 हजार रुपये
बिग बॉसच्या विजेत्याला म्हणजेच एमसी स्टॅन बिग बॉसची सुंदर ट्रॉफी, 31 लाख 28 हजार रुपये, कार बक्षीस मिळाली. MC Stand चा जन्म एका गरीब कुटुंबात झाला पण त्याच्या मेहनतीमुळे आणि त्याच्या टॅलेंटच्या जोरावर तो आज श्रीमंत व्यक्ती बनला आहे. बिग बॉसच्या घरात त्याच्या गळ्यात दीड कोटींची चेन आणि 80 हजाराचे शूज घालून फिरत असतो.बिग बॉस १६ च्या घरातील मंडली अखेर हा ट्रॉफीवर हक्क गाजवला. ट्रॉफी मिळताच स्टॅनने सलमान खानच्या सांगण्यावरून रॅप परफॉर्म आणि जाता जाता सर्वांचे आभार मानले.
Edited by : Ratnadeep Ranshoor