व्ही जगतातील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो 'बिग बॉस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान लवकरच बिग बॉस 17 चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सलमान खानचा बिग बॉस 17 मधला पहिला लूक समोर आलाय. सलमान नवीन पर्वात एकदम हटके आणि डॅशिंग अवतारात दिसतोय.
या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत अनेक नावांची चर्चा होत आहे. या चर्चांदरम्यान 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खानचा शोच्या ग्रँड प्रीमियरमधील फर्स्ट लूक समोर आला आहे.
सलमान खानचा बिग बॉस 17 मधला नवीन लूक
'बिग बॉस 17'चा ग्रँड प्रीमियर 15 ऑक्टोबरला होणार आहे. याआधीच शोच्या ग्रँड प्रीमियरची झलक देखील समोर आली आहे. सलमान खानचा बिग बॉसमधील पहिला लूक समोर आलाय. यात सलमान ब्लॅक टीशर्ट आणि लाल रंगाच्या जॅकेटमध्ये एकदम डॅशिंग अंदाजात दिसतोय.
सलमान खानच्या या नवीन लूकमध्ये बिग बॉसचा भव्यदिव्य सेटही दिसत आहे. या सेटमध्ये एक खास गोष्ट दिसतोय. ते म्हणजे यंदा बिग बॉस 17 मध्ये रेल्वे इंजिन पाहायला मिळतंय. या सेटवर सलमाने खास फोटोशूट केलेलं दिसतंय.
यावेळी 'बिग बॉस'मध्ये 16 स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. अंकिता लोखंडे, विक्की जैन, मुनव्वर फारुकी, ईशा मालवीय आणि विवेक चौधरीसह अनेक सेलेब्रिटी आणि नॉन सेलेब्रिटी 'बिग बॉस 17' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.
15ऑक्टोबरला रात्री ९ वाजता 'बिग बॉस 17 सुरु होणार आहे. प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉम जिओ सिनेमावर 24 तास हा शो लाईव्ह पाहू शकतात. त्याशिवाय सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार-रविवार रात्री 9 वाजता कलर्सवर पाहू शकता.
Edited By - Ratnadeep Ranshoor