कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विरुष्काही त्यांच्या या आशियान्यामध्ये लॉकडाऊनचा काळ व्यतीत करत आहेत. या जोडीसाठी त्यांच्या एका खास शेजाऱ्यानं तितकाच खास असा घरचा डब्बा पाठवला आहे.
खुद्द विराटनंच सोशल मीडियावर या शेजाऱ्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्याचे आभारही मानले आहेत. विराट आणि अनुष्काचे शेजारी भारतीय क्रिकेट संघातीलच एक खेळाडू. विराट आणि अनुष्काच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर राहणारा हा खेळाडू आहे, श्रेयस अय्यर.
श्रेयसनं घरातून बनवून आणलेल्या या खास खाद्यपदार्थाविषयी आभार मानत विराटनं लिहिलं, 'आमच्या घरापासून अवघ्या ५०० मीटरच्या अंतरावर असणाऱ्या या अतिशय प्रेमळ शेजाऱ्यानं आमच्यासाठी घरी बनवलेला नीर डोसा आणत आमच्या चेहऱ्यावर आनंद आणला. तुझ्या आईचे मी याबाबत खूप सारे आभार मानतो. कारण इतके चवीष्ट डोसे आम्ही यापूर्वी बऱ्याच काळापासून खाल्ले नव्हते. मी आशा करतो की तुला आम्ही दिलेली मश्रूम बिर्यानी आवडली असेल, श्रेयस'.