बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर 64 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. मुंबईच्या न्यायालयाने सोमवारी राज कुंद्राला जामीन मंजूर केला होता. राज कुंद्राची मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सुटका झाली.
न्यायालयाला 50,000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले. 19 जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक केली होती. 64 दिवसांनंतर राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली. कुंद्रावर पॉर्न फिल्म बनवून मोबाइल अॅपवर स्ट्रीम केल्याचा आरोप आहे.
गुन्हे शाखेने सांगितले की, पोर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासादरम्यान व्यापारी राज कुंद्राच्या मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमधून एकूण 119 अश्लील व्हिडिओ सापडले. राज कुंद्रा हे सर्व व्हिडिओ एकूण 9 कोटी रुपयांना विकण्याचा विचार करत होते, असा पोलिसांचा दावा आहे.