Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
, शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (21:00 IST)
बॉलीवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसीएल फायनान्स कंपनी व एडलवाईस ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून पाचही जणांविरोधात कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, नितीन देसाई यांच्या कंपनीवर कर्ज होतं. नोव्हेंबर २०१६ मध्ये नितीन देसाई यांच्या कंपनीने एडलवाईस एआरसीकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले. जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकू लागले. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यासाठी जुलै २०२२ मध्ये एनसीएलटीकडे याचिका करण्यात आली होती, असं एडलवाईस एआरसीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं होतं.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nitin Desai Funeral: नितीन चंद्रकांत देसाई यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार, अनंतात विलीन