Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा
, शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (17:57 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला असून, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रिया चक्रवर्तीला समन्स बजावले. त्यामुळे तिला चौकशीसाठी हजर राहावे लागेल. सुशांतला रियानेच आत्महत्येला प्रवृत्त केले, त्याची आर्थिक फसवणूक केली आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे केला आहे. त्या आधारे आता सीबीआयने रिया व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध एफआयआर दाखल केल्याने, रियाच या प्रकरणातील प्रमुख आरोपी ठरण्याची शक्यता दिसून येत आहे.
 
मुलीची बदनामी ऐकून डिप्रेस झालोय - सोशल मीडियात माझ्या मुलीची होणारी बदनामी ऐकून डिप्रेस झालोय, असे दिशा सालीयनची आई वासंती यांनीएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेतर, अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा अशी विनंती तिच्या वडिलांनी मालवणी पोलिसांना केली.
मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हारियाने त्याच्या खात्यातून १५ कोटी काढल्याचा आरोप आहे. पाटणा पोलिसांनी दाखल कलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.
 
सुशांत आणि रियामध्ये ८ जून, २०२० ते १४ जून, २०२० दरम्यान कोणतेही संभाषण झालेले नाही. सुशांतच्या कॉल रेकॉर्ड तपासून पाहिल्यानंतर ही माहिती समोर आली.बिहार पोलिसांची घरवापसीसुशांत प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेले पाटणा पोलिसांचे पथक बिहारला परतणार आहेत. मात्र, आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना चौदा दिवसांचे क्वारंटाइन पूर्ण करुनच मुक्त केले जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.पाटणा आयजी संजय सिंग यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवत डीसीपी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्याची विनंती केली. तिवारी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत त्यांचे काम करावे, असे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना