rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदाबाद विमान अपघातावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख, अक्षय कुमार पासून परिणीती चोप्रा पर्यंत सर्वांनी केली प्रार्थना

अहमदाबाद विमान अपघातावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
, गुरूवार, 12 जून 2025 (17:14 IST)
अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच एका रहिवासी भागात कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. अपघातानंतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि शक्य तितक्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
 
या अपघातानंतर, सर्वजण विमानात उपस्थित असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. या अपघातानंतर देशभर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजण विमान अपघातावर शोक व्यक्त करत आहे.
 
अभिनेता अक्षय कुमारने पोस्ट केले, एअर इंडियाच्या अपघाताने  मला धक्का बसला आहे आणि अवाक झालो आहे. यावेळी, आपण फक्त प्रार्थना करू शकतो.
 
अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद, सनी देओलने, परिणीती चोप्रा, दिशा पटानी यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त करत प्रवासींसाठी प्रार्थना केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बालिका वधू' फेम अविका गोरने बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत केला साखरपुडा'