Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलिवूडमध्ये सेलिनाचे पुनरागन

Celina Jaitly
, सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (10:47 IST)
बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर एलजीबीटी कार्यकर्ती आणि अभिनेत्री सेलिना जेटली लवकरच पुनरागमन करणार आहे. सेलिनाची सीजन्स ग्रीटिंग्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये वापसी होणार आहे. या चित्रपटाची कथा आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. सेलिना यात मुलीची भूमिका  साकारणार आहे, तर लिलेट दुबे तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
याबद्दल सेलेना म्हणाली, राम कमल यांच्या सीजन्स ग्रीटिंग्ज चित्रपटाचा मी भाग बनल्यामुळे आनंदित आहे. कारण नेहमीच मी त्यांना सृजनशील व्यक्ती मानले आहे. त्यांनी याची कथा मला दुबईत सांगितली होती. तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता. 
 
माझ्या काळानुसार ही कथा माझ्यासाठी योग्य वाटत होती. लग्न आणि नंतर आई झाल्यानंतर मी अशाच विषयाच्या शोधात होते. हे तथ्य लक्षात घेऊनच मी गेली 18 वर्षे एलजीटीबी क्यूआईए आंदोलन (समलैंगिक अधिकार आंदोलन) याच्याशी जोडली गेली आहे. रितुदा (रितुपर्णो घोष) आम्हा सर्वांची प्रेरणा आहे. अखेर मी या मुद्द्याशी संबंधित चित्रपटात काम करणार आहे. दरम्यान, सेलिना 7 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होती. पीटर हागसोबत लग्न केल्यानंतर ती संसारात रमली होती. तिला 3 मुली आहेत. आता सेलिना पुन्हा अभिनयाकडे वळली आहे. तिची ही नवी इनिंग पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘२.०’चे ट्रेलर ३ नोव्हेंबर प्रदर्शित होणार