शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती राज कुंद्राविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्यावर गोल्ड स्कीममध्ये एका गुंतवणूदाराची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनिवासी भारतीय सचिन जोशी यांनी खार पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली होती की, सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडने त्यांची फसवणूक केली आहे. 
 
ही कंपनी आधी शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राजकुंद्रा चालवायचे. तक्रारदाराने म्हटल्यानुसार, त्यांनी मार्च २०१४ मध्ये १८. ५८ लाख रुपयांमध्ये एक किलोग्रॅम सोने या कंपनीच्या गोल्ड स्कीम अंतर्गत खरेदी केले होते. 
 
पाच वर्षांच्या योजनेंतर्गत त्यांना एक गोल्ड कार्ड देण्यात आलं. मात्र, २५ मार्च, २०१९ रोजी मुदत संपल्यानंतर तक्रारदाराला समजलं की, कंपनीचे बांद्रा कुर्ला कार्यालय बंद आहे. या कंपनीतून शिल्पाने २०१६ मध्ये आणि राजने २०१७ मध्ये राजीनामा दिला होता.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख कोरोना व्हायरसचा मोठा फटका फिल्म इंडस्ट्रीला