Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'छिछोरे' चित्रपट सलग चढत्या क्रमावर

'छिछोरे' चित्रपट सलग चढत्या क्रमावर
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला 'छिछोरे' चित्रपट सलग चढत्या क्रमावर आहे. कॉलेजच्या आठवणींमध्ये रमण्यास भाग पाडणारा हा चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. सात दिवसांमध्ये चित्रपटाने ६८.८३ कोटींचा गल्ला जमा केला आहे. 
  
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. परदेशात सुद्धा हा चित्रपट चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. 'ड्रीम गर्ल' आणि 'सेक्शन ३७५' चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. तर येत्या काळात हे चित्रपट एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग एका इंजिनियरिंगच्या कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे. सुशांत, श्रद्धाने प्रमुख भूमिका साकारली असून प्रतीक बब्बर सुशांतच्या मित्राची भूमिका साकारत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिशन मंगलकडून 200 कोटीचा आकडा पार