Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इरफानच्या कोब्रा चित्रपटाचा टीझर चर्चेत

webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:21 IST)
माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. इरफान पठाण दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत ‘कोब्रा' या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या या चित्रपटाची निर्मिती ललित कुमार यांनी केली आहे. 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे रिलीज डेट टळली होती. त्यामुळे इरफानचा अभिनय पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये लागून राहिली होती. इरफानचा अभिनय चाहत्यांच्या कितपत पसंतीस उतरतो, हेचित्रपट पाहिल्यानंतर समजणार आहे. 
 
सेव्हन स्क्रीन स्टुडिओने कोब्राच्या टीझरबाबत एक टि्वट केले आहे. अजय ज्ञानमुथू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीबरोबर तमिळ, तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. टीझरमध्ये इरफानच्या अभिनयाची एक झलक पाहायला मिळत असून हा टीझर 1 मिनिट 47 सेकंदाचा आहे. चित्रपटात अभिनेता विक्रमची भूमिका एका गणितज्ज्ञाची आहे. तर इरफानची भूमिका एका इंटरपोल ऑफिसरची आहे. ए.आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील  ’थम्पी थुल्ल' हे गाणे यापूर्वी रिलीज झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

नवऱ्याचं पूर्ण अंग दुखतंय !