rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा आई होणार

bharti
, मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (11:40 IST)
विनोदी अभिनेत्री भारती सिंगने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिचा पती हर्ष लिंबाचियासोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने दुसऱ्यांदा आई होण्याची आनंदाची बातमी दिली आहे. भारतीने या आनंदाच्या बातमीसह पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली आणि चाहते आणि सेलिब्रिटीही शुभेच्छा देत आहे.

तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर  बेबी बंप दाखवताना फोटो शेअर केले आहे. भारतीचा आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. व फोटोला कॅप्शन दिले आहे, "आपण पुन्हा गर्भवती आहोत."
ALSO READ: Sharad Kelkar Birthday अभिनेता शरद केळकर ज्यांच्या आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली
भारती सिंगने यापूर्वी अनेक वेळा मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारती सिंग सध्या तिच्या कुटुंबासह स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहे. तिथून, तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली. तिने "गोला मोठा भाऊ होणार आहे" शीर्षकाचा एक गोंडस व्हीलॉग देखील पोस्ट केला.
ALSO READ: सुपरस्टार अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुपरस्टार अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात