Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाले

राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाले
, गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (13:16 IST)
कॉमेडियन राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाला. सर्वांना हसवणारे राजू श्रीवास्तव कायमचे नि:शब्द झाले. राजू श्रीवास्तव यांच्यावर आज म्हणजेच गुरुवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी रडलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. काहींनी भावपूर्ण मनाने राजू अमर रहे...च्या घोषणाही दिल्या.
 
उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री सुनील पाल, मधुर भांडारकर, एहसान कुरेशी आदी राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले होते. सर्वांनी ओल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेतला.
 
10 ऑगस्ट रोजी जिममध्ये कसरत करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. गेल्या 41 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी निधन झाले. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण ओल्या डोळ्यांनी राजूला आदरांजली वाहत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टँड अप कॉमेडियन रोहन जोशीची 'ही' पोस्ट वादात