Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजानमुळे माझी झोपमोड का?, सोनू निगमकडून नव्या वादाला सुरुवात

अजानमुळे माझी झोपमोड का?, सोनू निगमकडून नव्या वादाला सुरुवात
मी मुस्लीम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का?, असा सवाल करत, सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मुस्लिम धर्माच्या अजानवर आक्षेप घेतला आहे. ट्विटरवरुन याबाबत मत व्यक्त केलं आहे.
 
मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल? “मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, असे सोनू निगम यांनी ट्वीटमधून विचारलं आहे. “जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही.”, असेही सोनू निगम म्हणाले. सोनू निगम यांचे ट्वीट आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ आता नवा वाद सुरु झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोल्ड अवतारात नर्गिस फक्री, शेअर केले फोटो