Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

webdunia
कोरोना व्हायरसमुळे ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. सूर्यवंशी’चे दिग्दर्शन रोहित शेट्टी याने केलं आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली. “आम्ही या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनीही आमच्या या मेहनतीला भरभरुन दाद दिली. मात्र सध्या देशभरात करोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.” 
 
अशा आशयाची पोस्ट लिहून रोहितने ही माहिती दिली. ‘सूर्यवंशी’ येत्या २४ मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत कुठलीही माहिती रोहितने दिलेली नाही. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

महाराष्ट्राचे पैठण गुंतते जेथे मन .....