Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करण का रडला?

करण का रडला?
, सोमवार, 9 जानेवारी 2017 (10:49 IST)
निर्माता दिग्दर्शक करण जोहर अतिशय संवेदनशील आणि हळवा व्यक्ती आहे. एखादी गोष्ट सहजपणे त्याच्या मनाला लागते. असाच एक प्रसंग घडला आणि तो मनापासून रडला. निकोल किडमॅनचा चित्रपट लायन पाहून त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
 
लायन चि‍त्रपटात आंतरराष्ट्रीय कलाकार रॉनी मारा आणि मूळ भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता देव पटेल, भारतीय अभिने‍त्री दीप्ती नवल, तनिष्ठा चटर्जी, प्रियंका बोस आ‍ि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हरवलेल्या भारतीय मुलाला एक परदेशी दांपत्य दत्तक घेते. 25 वर्षांचा झाल्यानंतर हा मुलगा आपल्या आईच्या शोधार्थ भारतात येतो अशी लायन चित्रपटाची कथा आहे.
 
देव पटेलने साकरलेल्या भूमिकेमुळे करण जोहर प्रभावित झाला आहे. लायन पाहून माझे हृदय पिळवटून निघाले. मला देव पटेल खूप आवडला. दुखी आणि भेदक गोष्ट पाहिली परंतू अनेक जादुई क्षणही अनुभवल्याचे करण जोहरने ट्विटरवर लिहिले आहे.
 
बेअर्ली याच्या ए लाँग वे होम या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. लायन हा चित्रपट 24 फेब्रवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे शूटिंग कोलकता आणि ऑस्ट्रेलियात पार पडले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘रईस’सोबत ‘बाहुबली 2’ चा प्रोमो