नुकताच अभिनेता आमिर खान या बहुचर्चित ‘दंगल’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ‘व्हिडिओ’ खुद्द आमिरने टिटरवरून शेअर केला असून ‘तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा’ असे आवाहनही केले आहे. सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर ङ्खोगट यांची भूमिका या चित्रपटात आमिर खान साकारत असून हा चित्रपट 23 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे.
या चित्रपटात महावीर ङ्खोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यामध्ये आमिर खान चित्रपटातील आपल्या चार मुलींसोबत दिसत आहे. म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असेदेखील या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी आमिर खानने आपला रावडी लूकदेखील शेअर केला होता. ज्यामधील त्याची शरीरयष्टी पाहून घेतलेली मेहनत दिसत होती.