आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त पाच दिवसांमध्ये तब्बल 155 कोटींची कमाई केली आहे. 100 कोटींची टप्पा तर चित्रपटाने फक्त तीन दिवसांमध्ये पार केला होता. आमीरच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले असून नवनवीन विक्रम केले आहेत. यासोबतच आमीर खानच्या 100 कोटी क्लबमध्ये अजून एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. याआधी गजनी, धूम, 3 इडियट्स आणि पीके चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या दंगलने पहिल्याच दिवशी 29.78 कोटींची कमाई केली. शनिवारी 34.82 आणि रविवारी 42.35 कोटींची कमाई करत तीनच दिवसात चित्रपटाने 100 कोटी पुर्ण केले. यानंतर सोमनारी 25.48 तर मंळवारी 23.07 कोटींची कमाई करत 155.53 कोटी कमावले आहेत.