Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिका पादुकोण स्वतःला क्रिएटिव ठेवण्यासाठी हे करतेय!

दीपिका पादुकोण स्वतःला क्रिएटिव ठेवण्यासाठी हे करतेय!
, बुधवार, 10 जून 2020 (09:00 IST)
लॉकडाउनच्या आधीपासूनच, दीपिका पादुकोणकडे चित्रपटांची मोठी यादी होती, जे तिला स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी बघायचेच होते. यानिमित्ताने तिने प्रतिष्ठित अंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या रूपाने चांगले चित्रपट, बहुप्रशंसित भारतीय वेब सिरीज आणि अन्य खूप काही बघून आपला वेळ व्यतीत करते आहे.
 
एवढेच नाही तर, अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना उत्तम काहीतरी बघण्याचे सल्ले देणे देखील सुरू केले आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक हाइलाइट आहे ज्यात तिने सुचवलेल्याची कलाकृतींची यादी सामील करण्यात आली आहे. याला 'डीपी के सुझाव' म्हटले जात आहे. यामध्ये जोजो रैबिट, फैंटम थ्रेड, हर, इनसाइड आउट, स्लीपलेस नाइट्स इन सिएटल यासारख्या चित्रपटांचा आणि पाताल लोक, हॉलीवुड सारख्या सिरीजचा समावेश आहे.
 
अभिनेत्रीने आपल्या दिवसाचा काही वेळ खास यासाठी राखून ठेवला आहे कारण विविध उल्लेखनीय अभिनय पाहून एका कलाकाराच्या रुपात आपल्या अभिनयाच्या क्षीतिजाला विस्तारायला मदत होणार आहे. हे सर्व काही तिला तिच्या नियमित झूम नरेशन व्यतिरिक्त क्रिएटिव राहण्यासाठी मदद करते आहे. दीपिका पादुकोण जी आपल्या ऑन-स्क्रीन करिष्म्यासाठी ओळखली जाते, ती रचनात्मक अर्थाने ऑनलाइन स्क्रिप्ट नरेशन ऐकण्यासाठी देखील आपल्या लॉकडाउनचा हा वेळ सत्कारणी लावते आहे. 
 
आपल्या कलेप्रति उल्लेखनीय रूपाने समर्पित, दीपिकाची ही सगळी मेहनत तिला सेटवर परतण्याच्या काळात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. जर हे लॉकडाउन नसते तर, दीपिका या वेळी श्रीलंकेमध्ये शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जान्हवी कपूरचा ‘द कारगील गर्ल‘ अवतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला