Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबब... दीपिकाची अंगठी दोन कोटींची

अबब... दीपिकाची अंगठी दोन कोटींची
, सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (12:32 IST)
दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बहुचर्चित विवाह एकदाचा संपन्न झाला. या विवाहाची छायाचित्रे प्रसिद्ध होताच त्यातील बारकाव्यांची चर्चाही जोरात सुरू झाली आहे. सर्वप्रथम चर्चा दीपिकाच्या चुनरीची सुरू झाली. यानंतर सुरू झाली ती तिच्या अंगठीची. ही अंगठी तब्बल दोन कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. 
 
बॉलिवूड लाईफमधील माहितीनुसार दीपिकाने घातलेली रिंग अथवा अंगठीची किंत 1.3 ते 2.7 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. विशेष म्हणजे या अंगठीत एक आकर्षक हिराही दिसून येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाने आपल्या विवाहासाठी एक कोटी रुपयांची ज्वेलरी खरेदी केल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. यामध्ये 20 लाखांच्या मंगळसूत्राचा समावेश होता. याशिवाय दीपिकाने रणवीरसाठी 200 ग्रॅम सोन्याची चेनही खरेदी केल्याचे चर्चेत होते. रणवीर आणि दीपिका यांच्या विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आणि प्रचंड वेगाने व्हायरल होण्यास सुरुवात झाली. या बहुचर्चित जोडीचा विवाह इटलीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विवाहावेळीपरिधान केलेल्या दीपिकाच्या चुनरीवर 'सदा सौभाग्यवतीभव' असे ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते. आता ही जोडी भारतात परतल्यानंतर स्वागत सारंभ आयोजित करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर