दीपिका आपल्या आव्हानात्मक भूमिकांच्या प्रक्रियेबाबत अधिक चर्चा करत नसेल, मात्र त्याविषयी प्रत्येक वेळी काही ना काही नवी माहिती हाती येते ज्यामुळे दीपिका आपल्या व्यक्तिरेखांचा कसा सखोल अभ्यास करते, हे कळते.
अभिनेत्रीच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की,"दीपिकाने आपल्या दिवसातील काही वेळ शकुन बत्रा यांच्या
आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी राखून ठेवला असून ती त्या स्क्रिप्टची काही पाने वाचण्यासाठी नियमित वेळ काढते आहे. या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेची तिला इतक्यात अधिक तयारी करायची नसली तरी, तिला आपल्या या व्यक्तिरेखेतून पूर्णपणे बाहेर देखील पडायचे नाही. कारण लॉकडाऊन उठल्यानंतर ती याच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे."
जर लॉकडाऊन नसता तर, अभिनेत्री ने श्रीलंकेमध्ये चित्रपटाचे एक शेड्यूल आतापर्यंत पूर्ण केले असते.
दीपिकाने या आधी देखील शकुन बत्रा यांच्या सोबत काम केले आहे, त्यांच्या सिनेमच्या स्वादाविषयी ती अनेकदा बोलली आहे आणि त्यामुळे ती त्यांच्या या आगामी चित्रपटाबाबत देखील फार उत्सुक आहे.
दीपिकाने वेळो वेळी अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखांना पडद्यावर जीवंत केले आहे. प्रत्येक चित्रपटसोबत, अभिनेत्रीने एक नव्या व्यक्तिरेखा यशस्वीरित्या सादर केल्या आहेत, ज्यांना दर्शकांचे भरभरून प्रेम देखील मिळाले आहे. मग ते नैना, वेरोनिका, पद्मावती, लीला असो- या सर्व व्यक्तिरेखा या त्या त्या गहन अभ्यासाचाच परिणाम आहेत जो दीपिकाने नेहमी आपल्या भूमिकांसाठी केला आहे.
आम्हाला विश्वास आहे की, दीपिका पादुकोण सेटवर परतायला जेवढी उत्सुक आहे, तेवढेच आपण देखील तिला पडद्यावर पहायला उत्सुक आहोत.