Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

जेव्हा सनी देओलने आपल्या वडिलांकडून मार खाल्ला

bollywood news
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 10 चा येत्या वीकएंडचा भाग हा मनोरंजनाने भरगच्च भरलेला असणार आहे. ज्यात महान अभिनेता धर्मेंद्र आणि त्याची मुले सनी आणि बॉबी देओल उपस्थित असणार आहेत. त्यांच्यामुळे कार्यक्रमाचे ग्लॅमर नक्कीच शिगेस पोहोचेल. चित्रपट व्यवसायाचा अविभाज्य भाग बनलेल्या धर्मेंद्रने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आणि या भागात तो प्रेक्षकांनाज मनमुराद हसवणार आहे.
 
या कार्यक्रमात जेव्हा मनीष पॉल धर्मेंद्रसोबत रॅपिड फायर खेळला, तेव्हा त्याने धर्मेंद्रला सनी आणि बॉबी या त्याच्या मुलांबद्दल विचारले, त्यावर धर्मेंद्रने आपल्या मुलांचे काही रोचक किस्से ऐकवले. जेव्हा मनीषने त्याला विचारले की दोघांपैकी त्याचा अधिक लाडका कोण आहे, तेव्हा तो म्हणाला की एक त्याचा डावा डोळा आहे तर एक उजवा. तो म्हणाला की दोघांमुळे त्याची मान अभिमानाने उंचावली आहे आणि त्याचे त्या दोघांवर सारखेच प्रेम आहे. जेव्हा त्याला विचारले की त्या दोघांपैकी लहानपणी पैसे कोण चोरत असे? त्यावर त्याने सांगितले की, त्यांच्या मागणी पेक्षा मी त्यांना जास्त पैसे पुरवत असल्यामुळे पैसे चोरण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. धर्मेंद्रने आपल्या मोठ्या मुलाला मार दिल्याचा किस्सा देखील सांगितला. जेव्हा सनी तरुण होता, त्यावेळी धर्मेंद्रने त्याला एक खेळण्यातली बंदूक भेट दिली होती. सनीने त्यात खोट्या गोळ्या घालून त्या घरातील सर्व आरशांवर मारल्या होत्या व सर्व आरसे फोडले होते. मागाहून धर्मेंद्रला आपल्याला इतका राग आला याची खंत वाटली. किस्सा सांगता सांगता धर्मेंद्रच्या डोळ्यात पाणी तरळले होते आणि त्याने अभिमानाने सांगितले की त्याची दोन्ही मुले बहुमोल हिरे आहेत आणि त्याचे त्या दोघांवर खूप प्रेम आहे.
 
सेटवरील सूत्राने सांगितले की, “धर्मेंद्र आणि त्याच्या मुलांसोबतची थट्टा मस्करी मजेदार होती. त्याचे आपल्या दोन्ही मुलांवर प्रेम आहे आणि त्याने भूतकाळातील काही रंजक आठवणी सांगितल्या. देओल कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. त्या सर्वांच्या गप्पा ऐकायला सर्वांनाच मजा आली. आणि इतका मोठा कलाकार कार्यक्रमात येणे हे कार्यक्रमाचे भाग्यच होते.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'अगडबम'ची नाजुका परतली