Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलीप कुमार यांची शरद पवार यांनी घेतली भेट

दिलीप कुमार यांची शरद पवार यांनी घेतली भेट
, रविवार, 6 जून 2021 (19:45 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली.
 
दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
गेले काही दिवस त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे तसंच रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याचं दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितलं.
 
ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. या काळात त्यांनी 63 चित्रपटाच काम केलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले.
 
सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये 11 डिसेंबर 1922 साली त्यांचा जन्म झाला. त्याचं मूळ नाव युसूफ खान होतं. त्यांचे वडील फळ व्यापारी होते.
 
ज्वार भाटा हा त्यांचा पहिला चित्रपट 1944 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1998 मध्ये आलेल्या किला चित्रपटातली भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. मुघल-ए-आजम, नया दौर, देवदास, या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्यांचे असंख्य चाहते आहेत.
 
दिलीप कुमार सायरा बानो यांच्याबरोबर 11 ऑक्टोबर 1966 ला झाला. तेव्हा सायरा फक्त 25 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमारांचं वय 44 वर्षं होतं.
 
त्यांना पद्मविभूषण हा भारताचा नागरी सन्मान आणि पाकिस्तानचा 'निशान-ए-इम्तिआज' या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. 2000-2006 या काळात त्यांनी राज्यसभेत खासदारपदही भूषवलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाऊ -बहीण