Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा भाग आहे!’ : आयुष्मान खुराना

ayushyaman khurana
, सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (11:41 IST)
बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याचे क्रिकेटवरील ज्ञान आणि गहन निरीक्षण या विश्वचषकात दिसून आले आहे! त्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांशी संपर्क साधला आणि दाखवून दिले आहे की तो या खेळाचा खुप मोठा फ़ॉलोवर आहे! त्याने हे देखील उघड केले आहे की तो पंजाबमधील अंडर-19 जिल्हास्तरीय टीम मध्ये क्रिकेटपटू होता आणि तो या खेळाला खूप आवडीने फॉलो करतो.
 
आयुष्मान लवकरच क्रिकेटवर चित्रपट करण्यास उत्सुक आहे. तो म्हणतो, “क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा एक भाग आहे आणि मला आशा आहे की ती लवकरच पूर्ण होईल! मला असे वाटते की जेव्हाही असा चित्रपट होईल तेव्हा माझे क्रिकेट कौशल्य खऱ्या अर्थाने उपयोगी पडेल.”
 
अनेक दिवसांपासून अशी अफवा पसरली आहे की आयुष्मान खुराना दिग्गज भारतीय क्रिकेट कॅप्टन सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये अभिनय करणार आहे जे नक्कीच देशाचे लक्ष वेधून घेईल. त्यांच्या या विधानामुळे या अटकळांना आणखीच खतपाणी मिळते कारण या मोठ्या प्रोजेक्ट ची घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुष्पा 2: अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2' साठी फी न घेण्याचा निर्णय घेतला