प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला 'दोस्ताना' आठवतोय? 2010 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला होता. जॉन अब्राहच्या या चित्रपटातील एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती. बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनचा हा सीन चित्रपटाइतकाच गाजला होता. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, लवकरच 'दोस्ताना2' येणार आहे. होय, म्हणजे या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण नव्या रूपात, नव्या स्टार्ससह. होय, 'दोस्ताना2'ची स्क्रिप्ट तयार आहे. करण जोहर या चित्रपटासाठी कमालीचा उत्सुक आहे. पण यात त्याला नवी स्टारकास्ट हवी आहे. त्यामुळे प्रियांका, जॉन आणि अभिषेक या त्रिकुटाऐवजी नवे चेहरे या चित्रपटात दिसतील. साहजिकच, जुन्या कलाकारांना याचे दुःख होणारच. जॉन तर ही बातमी ऐकून प्रचंड दुःखी झालाय. मी या चित्रपटाचा भाग नसणार, याचे सर्वाधिक दुःख आहे. पण करणच्या या चित्रपटाला मी शुभेच्छा देईन, असे जॉन म्हणाला. आता करणचा हा नवा 'दोस्ताना2' कसा रंगतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.