Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Drishyam 2 : दृश्यम 2 ची रेकॉर्डब्रेक कमाई

Drishyam 2 : दृश्यम 2 ची  रेकॉर्डब्रेक  कमाई
, रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (13:12 IST)
अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आज नवव्या दिवशी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जबरदस्त ओपनिंग घेणाऱ्या या चित्रपटाने वीकेंडमध्ये आणखी दमदार कामगिरी केली.100 कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या या चित्रपटाच्या नवव्या दिवशीचे  ताबडतोब कलेक्शन झाले आहे. 
 
'दृश्यम 2' प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यात यशस्वी ठरत आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जवळपास ५० कोटींवर पोहोचले आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम 2' ने पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) आणखी दमदार कामगिरी करत 21.59 कोटींची कमाई केली. रविवारच्या सुट्टीचा चित्रपटाला जबरदस्त फायदा झाला, त्यामुळे 'दृश्यम 2'चे कलेक्शन तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींवर पोहोचले. यानंतर चौथ्या दिवशी (पहिल्या सोमवारी) चित्रपटाने 11.87 कोटी रुपयांची कमाई केली. 
 
पाचव्या दिवशी (मंगळवार) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10.48 कोटी रुपयांची कमाई केली. सहाव्या दिवशी (बुधवार) चित्रपटाने 9.55 कोटी रुपयांची कमाई केली. सातव्या दिवशी चित्रपटाने 8.62 कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी (दुसऱ्या शुक्रवारी) चित्रपटाने 7.87 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर नवव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी अपेक्षेप्रमाणे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, 'दृश्यम 2' ने आज 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 124.553 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
 
 'दृश्यम 2' हा अजय देवगणच्या 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल आहे. हिंदीमध्ये बनवलेले 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' हे मल्याळम भाषेत एकाच नावाने बनवलेल्या चित्रपटांचे रिमेक आहेत.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विक्रम गोखलेंसाठी नाना पाटेकरांची भावनिक पोस्ट