Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनी ते कोहली: सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वच जण होत आहेत म्हातारे

धोनी ते कोहली: सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वच जण होत आहेत म्हातारे
आपलं वाढतं वय लपवण्याकडेच सगळ्यांचाच कल असतो. पण सोशल मीडियावर मात्र अनेकांना म्हातारं होण्याचं वेड लागलं आहे. कदाचित तुम्हीही तुमच्या मित्र-मैत्रिणींचे चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेले, केस पिकलेले फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर पाहिले असतील.
 
सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सगळेचजण भविष्यात डोकावून साठी-सत्तरीत आपण कसे दिसू याचा अंदाज घेत आहेत... FaceAppChallenge च्या माध्यमातून.
 
म्हातारपण असं असेल, या कॅप्शनसह अर्जुन कपूरनं आपला फोटो शेअर केलाय.
webdunia
वरुण धवननं आपला फोटो शेअर करताना सत्तरीत आपण असे दिसू, पण वर्क आउट करणं थांबवणार नाही असं म्हटलंय. अनिल कपूर शंभरीत असे दिसतील असंही त्यानं म्हटलं आहे.
webdunia
आयुषमान खुरानानं आपल्या वृद्ध फोटोला 'देसी बाँड' असं कॅप्शन दिलंय.
webdunia
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यासुद्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यांनीसुद्धा हे FaceAppChallenge घेतलं आहे, पण थोडंसं हटके पद्धतीनं.
webdunia
स्मृती इराणी यांनी आपला 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' या मालिकेतला तुलसीच्या भूमिकेतला फोटो शेअर केला आहे. FaceAppChallenge च्याही आधी एकता कपूरनं हे करून दाखवलं होतं, असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे.
 
आपले क्रिकेटपटू म्हातारे झाल्यावर कसे दिसतील, याचीही झलक पहायला मिळत आहे.
webdunia
हा झाला गमतीचा भाग, पण या फोटोंच्या नावाखाली हे अॅप लोकांची खाजगी माहिती गोळा करत आहे, असा आरोपही होत आहे. तसंच परवानगीशिवाय तुमच्या गॅलरीतून फोटोंची माहिती घेत असल्याचंही सांगितलं जात आहे.
 
जुनाच वाद पुन्हा
पण हा वाद नवीन नाहीये. दोन वर्षांपूर्वी या अॅपवर असेच आरोप करण्यात आले होते.
 
रशियाच्या यारोस्लाव गोनचारोव्ह यांनी हे मोबाईल अॅप सुरू केलं आहे.
 
मोबाईल अॅपची 'privacy policy' अशी बनवली आहे, की त्यामुळे तिसऱ्या पक्षाला माहिती पुरवण्यात मदत होत आहे, असा आरोप होत आहे.
 
सध्या या अॅपमध्ये अपडेट्स आले आहेत. तुम्ही म्हातारं झाल्यावर कसं दिसाल याचा फाटो हे अॅप दाखवत आहे.
 
या अॅपचे अपडेट आले आहेत, तेव्हा नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 'हे अॅप परवानगीशिवाय युजर्सची माहिती गोळा करत आहे,' असं काहीजण सोशल मीडियावर लिहित आहेत.
 
हे अॅप युजर्सची खाजगी माहिती काढून घेत आहे, असं ट्वीट तंत्रज्ञान विषयक रिपोर्टर स्कॉट बडमॅन यांनी केलं आहे.
 
2020मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धर्तीवर ही रशियन कंपनी लोकांची माहिती गोळा करत आहे, असंही म्हटलं जात आहे.
 
'हे अॅप खरंच खाजगी माहिती गोळा करत आहे का?'
दरम्यान काही तज्ज्ञांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. FaceApp हे युजर्सचे फोटो गोळा करत नाहीये, असं नामांकित हॅकर इलिएट एल्डरसन यांनी ट्वीट केलं आहे.
 
Guardian IOS appचे CEO विल स्ट्राफाच यांनीही या आरोंपावर आक्षेप नोंदवला आहे. माहिती गोळा करणाच्या घटना या अॅपवर दिसल्या नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, FaceApp ने मात्र अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
 
'नको असलेले अॅप इन्स्टॉल करू नका'
 
"फोनमध्ये कोणतंही अॅप इन्स्टॉल करताना आपण त्यातल्या सूचना काळजीपूर्वक वाचत नाही. संबंधित अॅपला तुम्ही सगळ्या परवानग्या देऊन टाकता. त्याच्या नियम आणि अटी या तुमच्या खाजगी माहिती वापरण्याविषयी असतात. त्यामुळे तुम्ही वापरत नसलेले अप्लिकेशन्स ताबडतोब काढून टाकणं किंवा नको असलेली अॅप्स इन्स्टॉल करू नयेत," असं तंत्रज्ञान विषयक अभ्यासक सेल्व्हा मुरली यांनी बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं.
 
तुमची खाजगी माहिती लीक न होण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, असंही मुरली सांगतात.

फोटो: सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारामती आणि फलटण तालुक्यात दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु