Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Junior Mehmood passes away प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

junior mehmood
, शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (09:06 IST)
Junior Mehmood प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद राहिले नाहीत. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या 67व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या पोटाचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. वृत्तानुसार, अभिनेत्याचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला. त्यांच्यावर परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण, कॅन्सरशी लढा ते हरले. ज्युनियर मेहमूदने 'हाथी मेरे साथी', 'कारवां' आणि 'मेरा नाम जोकर'सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते.
 
ज्युनियर मेहमूदच्या निधनाला त्याचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी दुजोरा दिला आहे. उपचारादरम्यान अभिनेते मेहमूद यांनी त्यांचे जुने मित्र, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर सचिन आणि जितेंद्र ज्युनियर महमूदला भेटायला आले. भेटीदरम्यान सचिनने आजारी अभिनेत्याला आपण काही मदत करू शकतो का, अशी विचारणाही केली. मात्र, महमूदच्या मुलांनी कोणतीही मदत नाकारली.
 
अभिनेता ज्युनियर मेहमूद यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीला दु:ख झाले आहे. पाच दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत घालवलेल्या इंडस्ट्रीतील स्टार्समध्ये त्यांचा समावेश होता. रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर मेहमूदचे नाव नईम सय्यद होते आणि हे पेन नाव त्याला ज्येष्ठ कॉमेडियन मेहमूद यांनी दिले होते.
 
आपल्या फिल्मी करिअरमध्ये ज्युनियर मेहमूदने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. 1967 मध्ये संजीव कुमार यांच्या नौनिहाल या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी ते केवळ 11 वर्षांचे होते. यानंतर तो संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, हाथी मेरे साथी, हंगामा, छोटी बहू, दादागिरीसह अनेक चित्रपटांमध्ये दिसला. तो बहुतेक राजेश खन्ना आणि गोविंदा यांच्या चित्रपटांमध्ये दिसला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'कोकण चित्रपट महोत्सव' रंगणार