Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shamshera : 'शमशेरा'चे ट्रेलर पाहून चाहते भारावले तर काही म्हणतात ही तर मॅड मॅक्सची स्वस्त कॉपी

Shamshera : 'शमशेरा'चे ट्रेलर पाहून चाहते भारावले तर काही म्हणतात ही तर मॅड मॅक्सची स्वस्त कॉपी
, रविवार, 26 जून 2022 (15:46 IST)
'ये कहानी है उसकी, जो कहता था गुलामी किसी की अच्छी नहीं है और आझादी तुम्हें कोई देता नहीं... आझादी छिननी पडती है... ये कहानी है शमशेरा की...'
 
हा डायलॉग आहे रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर अशी तगडी स्टारकास्ट बहुचर्चित चित्रपट 'शमशेरा'चा. यशराज बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झालाय.
 
या चित्रपटाची सोशल मीडियावरही तुफान चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, सोशल मीडियावर याला मिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय.
 
काहीजण रणबीरचं कौतुक करताना दिसतायत, तर काही ठिकाणी सिनेमाला 'तुमसे ना हो पायेगा' म्हणत ट्रोल केलं जातंय.
 
असा आहे ट्रेलर...
शमशेराची कथा इंग्रजांच्या काळातील आहे. पण ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्या काळी काझा नावाचं एक शहर होतं आणि तिथे दरोडेखोरांची वसाहत असल्याचं दाखवण्यात आलंय. तिथल्या त्या कबिल्याचा प्रमुख म्हणजे शमशेरा. दाढी, वाढलेले केस, हातात कुऱ्हाड आणि चेहऱ्यावरचे हावभाव असा रणबीर कपूरचा ट्रेलरमधील अंदाज विशेष लक्षवेधी आहे.
 
हा शमशेरा त्याच्या टोळीसह आजूबाजूच्या गावात दरोडे टाकत असतो. पण इंग्रजांच्या वाढत्या अत्याचारामुळे शमशेरा आणि त्याच्या टोळीला चिथावणी मिळते. ही टोळी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्याचा निर्णय घेते. ब्रिटीश सरकार शमशेरा आणि त्याच्या टोळीला धडा शिकवण्यासाठी स्थानिक पोलिसाला बोलवलं जातं. शुद्ध सिंह असं या पोलिसाचं नाव आहे.
 
स्वातंत्र्याच्या या लढाईत शमशेरा आणि शुद्ध सिंग समोरासमोर येतात. असे हे कथानक आहे.
 
स्टारकास्ट...
या चित्रपटात रणबीर सिंग शमशेरा या मुख्य भूमिकेत दिसतो. त्यानंतर वाणी कपूर ही सोना या डान्सरच्या भूमिकेत दिसते.
 
वाणी आणि रणबीरच्या भूमिकेनंतर संजय दत्तच्या शुद्ध सिंह या भूमिका दिसतो. संजय दत्तचा कधीही न पाहिलेला लूक आणि भूमिका या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
 
लोकांच्या विविध प्रतिक्रिया...
काही लोक शमशेराला 'थॉर' आणि 'हॅरी पॉटर' सारख्या उत्तम हॉलिवूड चित्रपटांची स्वस्त कॉपी म्हणत आहेत. त्याचवेळी, व्हिलनला गंध लावल्यामुळे काहीजणांनी निर्मात्यांवर टीका केली आहे.

रोहित जैस्वाल नावाचा ट्विटर युजर लिहितो, 'शमशेरा या चित्रपटावर बहिष्कार टाकायला हवं. दहशतवादाला हिंदू धर्माशी जोडणे बंद करा.'

शमशेराचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर मीमर्स गँगलाही ताजं मिम मटेरियल मिळालं आहे.
 
तसं तर शमशेराकडे एक दमदार चित्रपट म्हणून पाहिलं जातंय. टीझर रिलीज झाल्यावर ही तीच अपेक्षा होती. मात्र या चित्रपटाचा ट्रेलरवरून वेगळाच अंदाज समोर येतोय. ट्रेलरवरून तर शमशेराची प्रतिमा लार्जर दॅन लाइफ दाखवण्यात आली आहे. चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आलाय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरा -बायको जोक- तू कोण आहेस ?