Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘रईस’च्या प्रदर्शनासाठी कसलीही तडजोड करणार नाही : फरहान

‘रईस’च्या प्रदर्शनासाठी कसलीही तडजोड करणार नाही : फरहान
मुंबई , सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 (11:05 IST)
अभिनेता फरहान अख्तरचा मनसेला टोला 
‘रईस’च्या प्रदर्शनासाठी कोणाला एक रुपयाही देणार नाही, अशा शब्दात अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तरने मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. प्रदर्शनासाठी आपण कसलीही तडजोड करणार नसल्याचे फरहानने म्हटले.
 
‘रईस’ सिनेमात शाहरुख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. मात्र मनसेने पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऐ दिल है मुश्‍किल’लाही विरोध करण्यात आला. मात्र आर्मी फंडला 5 कोटी रुपये देण्याची तडजोड करुन सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. फरहानने मात्र आपण अशा प्रकारची कसलीही तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे. आर्मीने निर्मात्यांकडून दिले जाणारे पैसे तातडीने नाकारले. त्यामुळे आपण एक रुपयाही देणार नसल्याचं फरहानने सांगितले. ‘ऐ दिल है मुश्‍किल’चे निर्माते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बैठकीतील तोडग्यानंतर मनसेचा चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा विरोध मावळला. पाकिस्तानी कलाकार माहिरा खानचा विरोध आणि फरहानचे स्पष्टीकरण, यावर आता मनसेकडून काय भूमिका घेण्यात येते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'विकता का उत्तर'च्या सेटवर साजरी झाली दिवाळी