rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखच्या चित्रपटात दिसणार फातिमा शेख

Fatima Sheikh appears
, मंगळवार, 8 जानेवारी 2019 (10:16 IST)
शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला 'झिरो' दणकून आपटला. त्यापूर्वी आलेले फॅन, रईस आणि दिलवाले आणि जब हॅरी मेट सेजल हे त्याचे सगळे सनेमे आपटले. शाहरुखचा जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाचा बजेट 90 कोटी रुपये इतका होता. पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केवळ 64.33 कोटी रुपये कमावले. फॅन, रईस आणि दिलवाले या चित्रपटांची गतही फार वेगळी नव्हती. त्यामुळे 'झिरो' शाहरुखसाठी महत्त्वाचा आहे. पण हा चित्रपटही फ्लॉप झाला. पण शाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'सॅल्यूट'. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी मे हिन्यात सुरु होणार होते. पण काही कारणास्तव येत्या फेब्रुवारीपासूनच याचे शूटिंग सुरू करण्याचा निर्णय किंगखानने म्हणे घेतला आहे. या चित्रपटात करिना कपूर शाहरुखची हिरोईन असणार, असे मानले गेले होते. पण आता एक ताजी बामती आहे. चित्रपटाचे निर्माता करिनाऐवजी फातिमा सना शेखला कास्ट करू इच्छितात, असे कळतेय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉलिवूडमधील सर्वात हँडसम!