Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेप आरोपी आसारामवर बनणार बायोपिक, या प्रोड्यूसरने खरेदी केले राइट्स!

रेप आरोपी आसारामवर बनणार बायोपिक, या प्रोड्यूसरने खरेदी केले राइट्स!
हल्ली बॉलीवूडमध्ये बायोपिक सिनेमाचा क्रेझ वाढलंय. नेते, महान लोकं, खेळाडू आणि कलाकारांच्या जीवनावर आधारित सिनेमे बनवण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. यात आता विशेष म्हणजे आसाराम बापू वर सिनेमा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. उल्लेखनीय आहे की बापू बलात्कारा आरोपाखाली कैद आहे.
 
रिपोर्ट्सप्रमाणे गँग ऑफ वासेपुर, तनु वेड्स मनु, शाहिद और द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर सारखे सिनेमे प्रोड्यूस करून चुकलेले सुनील बोहरा आता आसारामची बायोपिक निर्मित करू इच्छित आहे. हे चित्रपट जर्नलिस्ट उशीनर मजूमदार लिखित पुस्तक 'गॉड ऑफ सिन: द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ यावर आधारित असेल.
 
उशीनर द्वारे लिखित पुस्तकात आसारामच्या जीवनाशी निगडित बिंदू दाखवण्यात आले आहे. सिनेमासाठी राइट्स मागील महिन्यात खरेदी केले गेले आहेत.
 
सुनील बोहराने सांगितले की मी पुस्तक वाचली आहे आणि पीसी सोलंकी यांच्याहून प्रभावित झाले आहे ज्यांनी पीडित मुलीसाठी मोफत केस लढून तिला न्याय मिळवून दिला. म्हणून मला वाटले की यावर सिनेमा तयार केला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किम कर्दाशियांने पिंक बिकिनीत दाखवला आपला सेक्सी फिगर