Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वांनी 'त्यांच्या' आठवणी ताज्या केल्या, अन 'इरफान'च्या मुलाच्या अश्रूंचा बांध फुटला..

सर्वांनी 'त्यांच्या' आठवणी ताज्या केल्या, अन 'इरफान'च्या मुलाच्या अश्रूंचा बांध फुटला..
मुंबई , शनिवार, 10 एप्रिल 2021 (08:07 IST)
फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२० मध्ये इरफान खानचा मुलगा बबिल हा खुप भावनिक झाला.. अन त्याच्या अश्रूंचा बांध फुटला.. आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि रितेश देशमुख यांनी दिवंगत अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली, त्यावेळी त्याला भावना अनावर झाल्या नाही.. हे भावनिक दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.
 
इरफान खानसारखा प्रतिभावान कलाकार यापुढे आपल्यासोबत नाही, यावर विश्वास ठेवणे अजूनही खरोखर कठीण आहे. आपल्या अभिनयाच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेला हा 'पीकू' स्टार २ एप्रिल, २०२० रोजी स्वर्गाकडे रवाना झाला. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 'लाइफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार त्यांना मरणोत्तर देण्यात आला.
 
वर्षानुवर्षे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा प्रसारित करणार्या कलर्स चॅनेलने ट्विटरवरुन कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात इरफान खानचा मुलगा बबील खान आपल्या वडिलांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना भावनिक होतांना दिसला.
 
या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान यांना आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि रितेश देशमुख यांनी मनापासून श्रद्धांजली वाहिली. राव मंचावर म्हणाले की, “भावी पिढ्या इरफान खान यांच्याकडून बरेच काही शिकतील.”
 
बबीलनेही मनोगतात “तुम्ही सर्वांनी मला खुल्या हाताने स्वीकारले आणि तुम्ही मला खूप प्रेम दिले. आपण आणि मी एकत्र हा प्रवास करू. आम्ही भारतीय सिनेमाला नवीन उंचीवर नेऊ," असे सांगितले. बबीलने वडिलांच्या वतीने भाषण दिल्यावर राजकुमार रावलाही अश्रू अनावर झाले.
 
या सोहळ्यात बबीलने इरफान खानचे ड्रेस उत्सव कार्यक्रमासाठी परिधान केले होते. त्याची आई सुतापा सिकदार यांनी त्यांना सोहळ्यासाठी पोशाख करण्यास मदत केल्याचे त्याने यावेळी सांगितले.
 
इरफान खान यांना ‘अंगरेजी मेडिअम’मधील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला. राधिका मदन आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला हा विनोदी सिनेमा कोविडच्या संकटामुळे दीर्घकाळ प्रदर्शित होऊ शकला नव्हता.
 
माझ्या वडिलांना 'फॅशन शो' आणि 'रॅम्प वॉक'मध्ये भाग घेणे आवडत नाही, परंतु आपल्या कम्फर्ट झोनमधून सतत बाहेर पडण्यासाठी त्याने या कपड्यांमध्ये हे केले. काल रात्री मी नेमके हेच करीत होतो, नवीन ठिकाणी जरी मी अस्वस्थ होत होतो, असे बबील म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रद्धाचा डबल रोल