Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर अमिताभ बच्चन यांनी जाहीर केला त्यांचा उत्तराधिकारी

अखेर अमिताभ बच्चन यांनी जाहीर केला त्यांचा उत्तराधिकारी
, गुरूवार, 24 मार्च 2022 (21:44 IST)
मुंबई मायानगरीतील बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा उत्तराधिकारी नक्की कोण याचा खुलासा त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे. यासंदर्भात अमिताभ यांनी ट्विट केले आहे. याचे निमित्त आहे ते त्यांचा पुत्र अभिषेक बच्चन याचा येत असलेला नवा चित्रपट. अभिषेकचा आगामी चित्रपट ‘दसवी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हाच ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करत उत्तराधिकारीचाही खुलासा केला आहे. असं संबोधलं आहे.
 
अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होत असतो. त्याची बायको ऐश्वर्या राय आणि वडील अमिताभ बच्चन यांच्याइतकं यश तो मिळवू शकला नाही, असं ट्रोलर्सचं म्हणणं दिसून येतं. आता त्याचा दसवी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी ट्रेलर शेअर केला आहे. त्यासोबत हरिवंशराय बच्चन यांची एक कविताही त्यांनी शेअर केली आहे. “मेरे बेटे, बेटे होनेसे मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे! ~ हरिवंशराय बच्चन. अभिषेक तुम मेरे उत्तराधिकारी हो – बस कह दिया तो कह दिया!” असं ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटवर ज्युनियर बच्चननेही “लव्ह यू, पा. हमेशा और हमेशा के लिए” अशी भावनिक कमेंट केली आहे.या ट्विटवर लोकंही व्यक्त होत आहे. ट्विटर युझर अमर एन शर्मा यांनी लिहिले, “तुमच्या आजोबांची ही कविता तुमच्या संघर्षासाठी बनवली आहे, असे वाटते.” विजय ढिल्लन यांनी लिहिले, “श्री. बच्चनजी, तुम्ही हे आज जाहीर केले असले तरी आम्ही गुरु हा चित्रपट पाहिल्यानंतरच मान्य केले होते. ज्युनियर बच्चन भाईचा सुपर अॅक्टिंग असलेला तो चित्रपट होता.” रत्ना इफे यांनी लिहिले आहे, “एक अतिशय प्रेमळ आणि अभिमानी पिता आणि अतिशय कृतज्ञ मुलगा पाहून खूप आनंद झाला. किती छान पिता-पुत्र जोडी आहे. तुमच्या दोघांवर प्रेक्षकांचं प्रेम आहे.”
 
नुकताच अभिषेक बच्चनच्या दसवी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आहे, ज्याचे नाव आहे गंगाराम चौधरी. गंगाराम भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून तुरुंगात आहेत.चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटे ३७ सेकंदांचा आहे. ट्रेलरची सुरुवात गंगाराम म्हणजेच अभिषेक बच्चन तुरुंगात गेल्याने होते. तुरुंगात गंगारामला तुरुंगात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गंगारामने केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेतले असून, तुरुंगात राहून तो दहावी उत्तीर्ण झाला आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत निम्रत कौर आणि यामी गौतम दिसणार आहेत. निम्रतने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे, तर यामी कठोर आयपीएस अधिकारी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गावाशी नाळ जोडणाऱ्या 'विशू'चे ट्रेलर प्रदर्शित