Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर बबिताजीने ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले

अखेर बबिताजीने ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले
, मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (14:49 IST)
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबिता जी' अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी त्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलंय. माध्यमं आणि प्रेक्षकांना मुनमुन दत्तांनी खडे बोल सुनावलेत.
 
'बबिता जी' हे लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ता आणि 'टप्पू' हे पात्र साकारणारा त्यांचा सहकारी अभिनेता राज अनाडकट यांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर सुरू आहेत.काही प्रसारमाध्यमांमध्येही या चर्चांना स्थान दिल्याचं दिसून आलं.

सोशल मीडियावरील बरेच लोक मुनमुन आणि राज यांच्याबाबत आक्षेपार्ह मीम, फोटो, मजकूर पसरवत आहेत. या माध्यमातून ट्रोलिंग सुरू आहे.या सगळ्या गोष्टींना कंटाळून अखेर अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की,"सर्वसामान्य लोकांना सांगू इच्छिते की, तुमच्याकडून मला बऱ्याच अपेक्षा होत्या.मात्र, ज्या प्रकारच्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये लिहिल्या गेल्यात, त्यावरून शिकले-सवरलेले लोकांनीही दाखवून दिलंय की आपण किती मागासलेल्या समाजातील आहोत."
 
'तुमची मस्करी एखाद्याला मानसिकरित्या संपवू शकते'
अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "महिलांना त्यांचं वय, शरीर, आई बनण्याच्या गोष्टीवर बोलणं, हे केवळ तुमच्यासाठी मस्करी असू शकेल, पण तुमची मस्करी एखाद्याला मानसिकरित्या तोडू शकते, याची तुम्हाला जाणीव नाही.13वर्षांपासून मी लोकांचं मनोरंजन करतेय आणि माझी प्रतिष्ठा संपवायला
तुम्हाला 13 मिनिटंही लागले नाहीत.""जर पुढल्या वेळी कुणी नैराश्यात जाऊन स्वत:चा जीव घेतला, तर जरा थांबून विचार करा की, तुमच्या बोलण्यामुळे तर ती व्यक्ती त्या निर्णयापर्यंत पोहोचली नाहीय ना. मला लाज वाटते की, मी भारताचा मुलगी आहे," असं मुनमुन दत्ता म्हणाल्या.आणखी एका पोस्टमध्ये मुनमुन दत्ता यांनी म्हटलंय की, "मीडियाला कुणी अधिकार दिल्ला की, काल्पनिक आणि स्वत: रचलेल्या गोष्टींना बातमीच्या नावाखाली कुणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकवण्याचा?"
मुनमुन दत्ता यांच्या पोस्टला आता बऱ्याच जणांनी समर्थन दिलंय आणि सोबत असल्याचं सांगितलं जातंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना राणौत न्यायालयात हजर झाल्या नाही,वकिल म्हणाले की कोविडची लक्षण आढळली