कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणी या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोव्हिड 19 नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून नियमांचं उल्लघंन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या ड्रायव्हर आणि मित्रांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर आणि दिशा हे जिमनंतर ड्राईव्हसाठी गेले असताना वांद्र्यातील बँडस्टँड पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आधार कार्ड, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. त्यांची चौकशी केल्यावर ते कोणतंही योग्य कारण सांगू शकले नाहीत, त्यामुळे मुंबई पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागला.
मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि त्यांच्या काही मित्रांविरोधात कोविड 19 महामारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणात पोलिसांनी कुणालाही या प्रकरणात अटक केलेली नाही. उल्लेखनीय आहे की कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे.