Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युनिसेफ की वैश्विक सद्भावना राजदूत बनली प्रियंका चोप्रा

युनिसेफ की वैश्विक सद्भावना राजदूत बनली प्रियंका चोप्रा
संयुक्त राष्ट्र , मंगळवार, 13 डिसेंबर 2016 (16:55 IST)
अभिनेत्री प्रियंका चोप्राला युनिसेफचे नवीन वैश्विक सद्भावना राजदूतच्या रूपात नियुक्त करण्यात आले आहे. अभिनेत्रीने विश्वंभरातून उत्पीड़ित मुलांची सामूहिक आवाज बनणे आणि येणार्‍या पिढीसाठी एक उत्कृष्ट भविष्याचा निर्माण करण्यासाठी सोबत मिळून काम करण्याचा आग्रह केला आहे.    
 
संयुक्त राष्ट्राची बाल एजेंसीचे 70 वर्ष पूर्ण होण्याबद्दल सोमवारी रात्री येथे एका समारंभात फुटबॉलर डेविड बेकहम आणि 12 वर्षीय ब्रितानवी अभिनेत्री मिली बॉबी ब्राउनने युनिसेफचे नवीन वैश्विक सद्भावना राजदूताच्या रूपात प्रियंका चोप्राला नियुक्त करण्याची घोषणा केली.    
 
प्रियंकाने समारंभात संयुक्त राष्ट्राचे शीर्ष राजनायिक, युनिसेफचे सद्भावना दूत आणि मुलांना संबोधित करत म्हटले आहे की माझी इच्छा आहे की मुलं स्वत्रंत राहावे. त्यांना विचार करण्याची, जीवन जगण्याची स्वतंत्रता असावी.  
 
तिने म्हटले की मनुष्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून अद्यापही जगात मुलं हिंसा, र्दुव्‍यवहार आणि शोषणामुळे  असुरक्षित आहे. तिने म्हटले की आम्ही जगातील उत्पीड़ित मुलांची सामूहिक आवाज बनण्यासाठी आम्ही आपणास आज आमच्याशी जुळण्याचा आग्रह करत आहोत.    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महादेवाच्या रूपात राजकुमार राव