Publish Date: Tue, 14 Mar 2017 (15:59 IST)
Updated Date: Tue, 14 Mar 2017 (16:03 IST)
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने आगामी चित्रपट 'गोलमाल'मधील स्टारकास्टचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो शेअर केला आहे. गोलमाल सिरीजमधील हा चौथा भाग असून यानिमित्ताने पुन्हा एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटात अजय देवगणसोबत चित्रपटातील गोलमाल टीम पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल कपूर पुन्हा एकदा विनोदी भूमिकेतून मनोरंजन करताना दिसणार आहेत.